गणेशोत्सव 2024

Ganpati Visarjan : लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप; मुंबईचा राजा गणेशगल्ली मंडळाची तयारी पूर्ण

10 दिवस सेवा केल्यानंतर आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

10 दिवस सेवा केल्यानंतर आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे.

बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.

शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील चौपाट्यांवर पालिकेसह पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर मुंबईचा राजा गणेशगल्ली मंडळाची विसर्जनाची तयारी पूर्ण झालेली पाहायला मिळत आहे

मुंबईचा राजाची सकाळी ८ वाजता महाआरती होणार आहे. ही महाआरती झाल्यानंतर गिरगाव चौपाटीच्या दिशेने विसर्जन मिरवणूक सरकण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

५० हून अधिक मतदारसंघांत नामसाधर्म्य असलेले उमेदवार: मतविभाजनाची भीती

अंबरनाथमध्ये मुस्लिम जमातचा डॉ. बालाजी किणीकर यांना पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या नवी मुंबईत सभा; वाहतुकीत मोठा बदल

Salman Khan : सलमान खान धमकी प्रकरणी कर्नाटकमधून एकाला अटक